मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mobile Tower : अधिकारी असल्याचं सांगत २० लाखांचे टॉवर चोरले; विचित्र दरोड्यामुळं पोलिसही चक्रावले

Mobile Tower : अधिकारी असल्याचं सांगत २० लाखांचे टॉवर चोरले; विचित्र दरोड्यामुळं पोलिसही चक्रावले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 08:53 AM IST

Mobile Tower Theft : काही दिवसांपूर्वीच कंपनीनं टॉवरच्या देखभालीत तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाला हटवलं होतं. त्यानंतर आता २० ते २५ आरोपींनी कंपनीचे अधिकारी असल्याचं सांगत टॉवरची चोरी केली.

Mobile Tower Theft In Patna Bihar
Mobile Tower Theft In Patna Bihar (HT)

Mobile Tower Theft In Patna Bihar : आजपर्यंत तुम्ही वाहनचोरी, पूल चोरी किंवा रेल्वेच्या साहित्यांच्या चोऱ्यांच्या घटना ऐकल्या असतील. परंतु आता चोरट्यांनी चक्क २० लाख रुपये किंमतीचे टॉवर्स चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटण्यात ही घटना घडली असून मोबाईल टॉवर चोरीच्या या घटनेमुळं पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तब्बल २५ अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटण्यातील लालपुर राजपूताना परिसरात दोन-तीन कंपनींनी मिळून एक टॉवर उभा केला होता. गेल्या १५ वर्षांपासून तिथं कंपनीचं टॉवर होतं. परंतु २० ते २५ जणांनी जमिनमालकाला अधिकारी असल्याचं सांगत संपूर्ण टॉवरच खोलून नेलं. त्यासाठी त्यांनी भल्यामोठ्या वाहनाचाही वापर केला. एयरसेल कंपनीचं हे टॉवर असल्याची माहिती समोर आली आहे.

चोरी गेलेलं टॉवरचं भाडं एयरसेल कंपनीनं गेली अनेक वर्ष मालकाला दिलेलं नाही. जेव्हा कंपनीनं मालकाच्या जागेत टॉवर उभारलं होतं त्यावेळी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये देण्याचं ठरलं होतं. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर गेली सात वर्षांपासून जमीन मालकाला जागेचं कोणतंही भाडं मिळालेलं नाही. त्यामुळं आता सात लाखांच्या थकबाकीसाठी जमीन मालकानं एअरसेल कंपनीला कायदेशीर नोटीस जारी केली आहे. आरोपींनी २० लाखांचं टॉवर चोरून नेलं असून त्यांची अजून ओळख पटू शकलेली नाही. आरोपींनी ज्या मार्गावरून प्रवास केला आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येईल, असं पाटणा पोलिसांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग