मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Coronavirus in Delhi: दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती; दंडाची रक्कमही ठरली!

Coronavirus in Delhi: दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती; दंडाची रक्कमही ठरली!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 11, 2022 12:50 PM IST

Mask Mandatory in Delhi: करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती केली आहे.

Mask
Mask

Mask Mandatory in Delhi: करोना विषाणू अद्यापही पाठ सोडत नसल्याचं दिसत आहे. राजधानी दिल्लीत करोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं वाढत असून त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम मोडणाऱ्यांकडून थेट दंडही आकारण्यात येणार आहे.

दिल्लीत बुधवारी करोनामुळं आठ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मागील सहा महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. तसंच मागील २४ तासांत तिथं २,१४६ नवे रुग्ण आढळून आले असून करोना संसर्गाचा दर १८ टक्क्यांवर गेला आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्तीचं करण्यात आलं आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. खासगी कारमधून प्रवास करणाऱ्यांना हा नियम लागू होणार नाही.

जुलैच्या शेवटच्या दहा दिवसांत करोनामुळं १४ जण दगावले होते, मात्र ऑगस्ट महिन्यात पहिल्या दहा दिवसांत दिल्लीत करोनामुळं ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचं हे प्रमाण तिपटीनं अधिक आहे. अर्थात, करोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांमध्ये आधीपासूनच आजारी वा व्याधीग्रस्त असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. दिल्लीत कोविडमुळं आतापर्यंत २६,३५१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी दिल्ली सरकारनं एप्रिल महिन्यात मास्कची सक्ती उठवली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग