मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Madhya Pradesh : अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसचा भीषण अपघात, १० ठार, ५० जखमी
Madhya Pradesh Sidhi Accident
Madhya Pradesh Sidhi Accident

Madhya Pradesh : अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसचा भीषण अपघात, १० ठार, ५० जखमी

25 February 2023, 7:53 ISTNinad Vijayrao Deshmukh

Madhya Pradesh Sidhi Accident : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमआला गेलेल्या ३ बस गाड्यांना भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. यामुळे १० जण ठार तर ५० जण जखमी झाले आहेत.

Madhya Pradesh Sidhi Accident : मध्य प्रदेशात एका भरधाव ट्रकने तीन बसला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात तब्बल १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या बसगाड्या या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमावरून परत येत होत्या. या अपघात जखमी झालेल्या काही नगरिकांची प्रकृती ही चिंताजन आहे. त्यांना जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा अपघात मध्य प्रदेशातील रीवा आणि सिधी जिल्ह्याच्या सीमेवर रात्री ९ च्या सुमारास झाला.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतना येथे आयोजित कोल महाकुंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे काही नागरिकांना बसमधून आणले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमानंतर या बसेस परतत होत्या. दरम्यान, काही नागरिक हे बसमध्ये होते. या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. दरम्यान, एका भरधाव ट्रकचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसला ट्रकने धडक दिली. यामध्ये १० नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. तर ५० जण जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने रीवा आणि सिद्धी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी असलेल्या काही नागरिकांपैकी काहीची प्रकृती ही चिंताजनक आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रेवा येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी जखमींची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

विभाग