मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JEE Mains Result 2023 : JEE मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर, या ठिकाणी थेट पहा तुमचे गुणपत्रक

JEE Mains Result 2023 : JEE मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर, या ठिकाणी थेट पहा तुमचे गुणपत्रक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2023 10:46 AM IST

JEE Mains Result 2023 : JEE मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. jeemain.nta.nic.in वर हा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

 JEE Mains 2023 exam   (Photo by Santosh Kumar / Hindustan Times)
JEE Mains 2023 exam (Photo by Santosh Kumar / Hindustan Times)

दिल्ली : जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए ने शनिवारी जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकाल NTA JEE jeemain.nta, nic.in च्या अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार आहे.

Bhushan Singh : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरल्या प्रियांका गांधी मैदानात, केजरीवालही घेणार जंतरमंतरवर आंदोलकांची भेट

जेईई मेनची परीक्षा काही दिवसांपूर्वी पार पडली होती. या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. हा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने आज जाहीर केला आहे. संयुक्त प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याना त्यांचा निकाल NTA JEE च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या सोबतच nta.ac.in या संकेतस्थळावारी हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

Ajit Pawar : “गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…”, अजित पवारांची पुण्यात मिश्कील टिप्पणी

सत्र २ JEE परीक्षा ६, ८, १०, ११, १२, १३ आणि १५ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आली. परीक्षेची उत्तर पत्रिका ही १९ एप्रिलला जाहीर करण्यात आली. या संदर्भात काही आक्षेप असल्यास ते नोंदवण्याची अंतिम तारीख ही २१ एप्रिल होती. परीक्षेची अंतिम उत्तर पत्रिका ही २४ एप्रिलला जाहीर करण्यात आली. आज जाहीर झालेल्या निकाला सोबतच अंतिम उत्तरपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार NTA JEE च्या अधिकृत वेबसाइटवर आपले गुण आणि उत्तर पत्रिका देखील पाहू शकतात. एजन्सीने कट ऑफ देखील जाहीर केला आहे.

या ठिकाणी पाहा निकाल

जेईई मुख्य निकाल पाहण्यासाठी NTA JEE ची अधिकृत साइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध सत्र २ लिंकसाठी JEE मुख्य निकाल 2023 वर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक तपशील भरावा लागणार आहे. माहिती भरल्यावर सबमीट बटनवर क्लिक करा. यानंतर निकाल हा प्रसिद्ध होईल. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ही डाऊनलोड करता येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग