मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाटणा स्थानकावरील पॉर्न क्लिपमध्ये तूच होतीस ना? नेटकऱ्याच्या प्रश्नावर केंड्रा लस्टचं भन्नाट उत्तर

पाटणा स्थानकावरील पॉर्न क्लिपमध्ये तूच होतीस ना? नेटकऱ्याच्या प्रश्नावर केंड्रा लस्टचं भन्नाट उत्तर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2023 11:16 AM IST

Kendra Lust tweet on Patna Railway Station Porn Clip : पाटणा रेल्वे स्थानकावरील पॉर्न क्लिप प्रकरणावर अमेरिकन पॉर्नस्टार केंड्रा लस्ट ट्विट केले आहे.

Kendra Lust
Kendra Lust

Kendra Lust Tweet on Patna railway station Porn Clip: बिहारची राजधानी पाटणा येथील रेल्वे स्थानकावरील टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडिओ चालू झाला. ज्यामुळे अनेक प्रवाशांना शरमेने मान झुकवावी लागली. हा व्हिडीओ तब्बल ३ मिनिटे चालू होता. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब हा व्हिडिओ बंद केला. त्यानंतर रेल्वेच्या भोंगळ कारभारावर अनेकांनी टीका केली आहे. मात्र, या प्रकरणामुळे अमेरिकन पॉर्न स्टार केंद्र लुस्ट चर्चेत आली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये तूच होतीस ना? असे नेटकऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर केंद्र लुस्टने भन्नाट उत्तर दिले आहे.

दरम्यान, १९ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पटना जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर प्रवासी गया येथे जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत होते. मात्र, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या टीव्हीवर अचानक पॉर्न व्हिडिओ चालू झाला. ज्यामुळे प्लॅटफॉर्ममध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी प्लॅटफॉर्मवर महिला, लहान मुलेही होते. हा व्हिडिओजवळपास तीन मिनिटे चालत राहिला. हा संपूर्ण प्रकार प्रवाशांसह रेल्वे प्रशासनासाठी लाजिरवाणा होता.

या प्रकरणावर अमेरिकन पॉर्नस्टार केंड्रा लस्टनेही तिच्या ट्विटर अकाऊंटवरून स्वत:चा फोटो शेअर केला. हे ट्विट करताना तिने बिहार रेल्वे स्थानक असे हॅशटॅगचाही वापर केला. केंड्राचे हे ट्विट पाहून एका नेटकऱ्याने तिला या व्हिडिओ तूच होतीस ना? असा प्रश्न विचारला. यावर ती म्हणाली की, आशा आहे की, या व्हिडिओमध्ये मीच असेल. केंड्राचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. तसेच या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, या लाजिरवाण्या घटनेनंतर संबंधित जाहिरात एजन्सीवर आरपीएफ पोस्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, रेल्वेनेही या प्रकरणी कडक कारवाई केली आहे. डीआरएम प्रभात कुमार यांनी पाटणा जंक्शन येथे पॉर्न व्हिडिओ चालवणाऱ्या जाहिरात एजन्सीवर मोठा दंड ठोठावला असून त्यांनी या एजन्सीबरोबरचा करार रद्द करत ती एजन्सी काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही दिले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग