मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडिओ; धक्कादायक प्रकारामुळं प्रवाशांचा संताप

रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर सुरू झाला पॉर्न व्हिडिओ; धक्कादायक प्रकारामुळं प्रवाशांचा संताप

Mar 20, 2023 01:56 PM IST

railway station viral video : प्रवासी रेल्वेची वाट पाहत बसलेले असतानाच स्टेशनवरील स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

patna railway station viral video
patna railway station viral video (PTI)

patna railway station viral video : रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून त्यानंतर आता रेल्वेनं दोषींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. स्क्रीनवर माहिती पाहत असतानाच तिथं अचानक अश्लील व्हिडिओ सुरू झाल्यानं या लाजिरवाण्या घटनेमुळं प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पाटणा रेल्वे स्टेशनवरील टीव्ही सेटवर अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. सुरुवातीला प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्याचा आवाज मोठ्याने येऊ लागल्यानं प्रवाशांनी थेट रेल्वे अधिकारी आणि पोलिसाकडे या प्रकरणाची तक्रार दिली. धक्कादायक बाब म्हणजे हा पॉर्न व्हिडिओ काही सेकंद नाही तर चक्क तीन मिनिटं सुरुच होता. तरीदेखील त्याकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ बंद करत संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आरोपी कम्युनिकेशन एजन्सी, ऑपरेटर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

पाटणा रेल्वे स्टेशनवर एकूण १० प्लॅटफॉर्म आहे. त्यातील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहे. त्यातील एका प्लॅटफॉर्मवर सलग तीन मिनिटं पॉर्न व्हिडिओ सुरू होता. त्यानंतर आता रेल्वे स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४