मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त बोल, म्हणाले, रावण प्रभू श्री रामापेक्षा अधिक महान

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त बोल, म्हणाले, रावण प्रभू श्री रामापेक्षा अधिक महान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 17, 2023 03:42 PM IST

Jitan ram Manjhi : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझीयांनी म्हटले की,श्री रामदेव नाही तरएक काल्पनिक पात्रआहे. त्याचबरोबर रावणही रामायणमधीलकाल्पनिक पात्रआहे.

जीतन राम मांझी
जीतन राम मांझी

आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पुन्हा एका अक्कलेचे तारे ताडले आहेत. प्रभू रामांविषयी जीतन राम मांझी यांनी पुन्हा वादग्रस्त टिप्पणी केली आहे. मांझी म्हणाले की, रावणाचे चरित्र श्रीरामाहून मोठे आहे आणि रावण रामाहून अधिक महान होता.

पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी म्हटले की, श्री राम देव नाही तर एक काल्पनिक पात्र आहे. त्याचबरोबर रावणही रामायणमधील काल्पनिक पात्र आहे. मात्र कल्पनेच्या आधारावर जो ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यामध्ये रावणासोबत अन्याय केला गेला आहे. रामायणमध्ये रावणाला क्रुर दाखवून रामाची प्रतिमा मोठी करण्यात आली. आपले वैयक्तिक मत असल्याचे म्हणत जीतन राम मांझी यांनी म्हटले की, कर्मकांडाच्या बाबतीत रावण श्री रामाहून खूप पुढे आहे. रावणाचे चरित्र याबाबतीत रामपेक्षा मोठे आहे. मांझी यांनी म्हटले की, राम जेव्हा जेव्हा एखाद्या संकटात किंवा समस्येत असत तेव्हा त्यांना अलौकिक शक्तींकडून मदत मिळत होता. रावणासोबत असे काही होत नव्हते. रामायण ग्रंथाच्या लेखकाने कल्पनेच्या बाबतीतही रावणाला कनिष्ट दाखवले आहे. 

जीतन राम मांझी म्हणाले की, हे माझे वैयक्तिक मत आहे. मी रामाला मानत नाही तसेच रावणालाही मानत नाही. कल्पनेच्या आधारावर दोघांबाबत जे लिहिले आहे त्या आधारावर मी असे म्हणत आहे.

जीतन राम मांझी यांनी यापूर्वीही हिंदू धर्म आणि श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही मांझी यांनी रामायण व श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी  सत्यनारायण पूजेबाबतही वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, दलितांनी सत्यनारायण पूजा करू नये. जीतन राम मांझी यांनी ब्राह्मणांबाबतही वादग्रस्त टिप्पणी केली होती व यावर टिका होताना त्यांनी संक्रांतीच्या निमित्त पाटण्यात ब्राह्मण भोज आयोजित केले होते. 

 

IPL_Entry_Point

विभाग