मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mau Fire Incident : घरात आग लागल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांना मृत्यू; मदत व बचावकार्य सुरू

Mau Fire Incident : घरात आग लागल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांना मृत्यू; मदत व बचावकार्य सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 28, 2022 05:59 AM IST

Mau Fire Incident : आग लागल्याची घटना समोर येताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Mau Fire Incident In Uttar Pradesh Today
Mau Fire Incident In Uttar Pradesh Today (HT)

Mau Fire Incident In Uttar Pradesh Today : आग लागल्यानं मध्यरात्री घरात झोपेत असलेल्या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातल्या शाहपुरमध्ये ही घटना घडली असून त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न जारी असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनानं मदत व बचावकार्यही सुरू केलं आहे. संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर चूल सुरुच राहिल्यानं ही आग लागल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहांना घरातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहपुरमध्ये एका कुटुंबातील लोकांनी संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर चूल संपूर्णपणे विझवली नाही. परिणामी मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना घरात अचानक आग लागली. त्यामुळं एकाच कुटुंबातील एक महिला, एक वृद्ध आणि तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर या घटनेबाबतची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांना समजताच त्यांनी आरडाओरडा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. याशिवाय या घटनेची माहिती पोलिसांनाही तातडीनं देण्यात आली. त्यानंतर पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रशासनाकडून मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा...

या घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येक चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मऊ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण कुमार यांनी केली आहे. एकाच कुटुंबातील पाचही मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृतदेहांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग