मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 28 December 2022 Live Updates Marathi Breaking News

Marathi News Live Updates(HT)

Marathi News 28 December 2022 Live : आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी अहमदाबादेत

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना आज अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आईच्या आजारपणाबद्दल कळताच पंतप्रधान मोदी तातडीनं अहमदाबादला पोहोचले आहेत.

Wed, 28 Dec 202211:50 AM IST

Narendra Modi : आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी पोहोचले रुग्णालयात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना आज अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आईच्या आजारपणाबद्दल कळताच पंतप्रधान मोदी तातडीनं अहमदाबादला पोहोचले आहेत. 

Wed, 28 Dec 202203:27 AM IST

NCP Bike Rally : अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी; मुंबईत आज काढणार बाईक रॅली

Anil Deshmukh : शंभर कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपाखाली गेल्या एक वर्षांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीनं जोरदार तयारी केली असून मुंबईत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

Wed, 28 Dec 202212:04 AM IST

Student Suicide : बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पुणे शहरातील धक्कादायक घटना

Student Suicide In Pune : बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार पेठेत ही घटना घडली असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Wed, 28 Dec 202212:04 AM IST

Aurangabad : सलग दुसऱ्या दिवशी आढळला कोरोना रुग्ण; औरंगाबादेत खळबळ

Aurangabad City News : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाळूज महानगरमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यानंतर आता मुंकुंदवाडीतही एका तरुणाला आणि कैसर कॉलनीत महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून दोन्ही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Wed, 28 Dec 202212:02 AM IST

Yogesh Bhoir : शिवसेनेचे नेते योगेश भोईर यांना पोलिसांकडून अटक; शिवसैनिकांची पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी

Yogesh Bhoir Mumbai : खंडणी वसूल केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना अटक केली आहे. त्यामुळं मुंबईत हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भोईर यांच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे.