मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pardeep Kurulkar: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे शास्त्रज्ञ कुरुलकर RSS मध्ये १४ वर्षे 'सॅक्सोफोन' वाजवायचे

Pardeep Kurulkar: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे शास्त्रज्ञ कुरुलकर RSS मध्ये १४ वर्षे 'सॅक्सोफोन' वाजवायचे

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 08, 2023 06:52 PM IST

DRDO Scientist Pardip Kurulkar: हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेले शास्त्रज्ञ कुरूलकर संघाच्या शाखेत 'सॅक्सोफोन' वाजवायचे, अशी माहिती समोर आली आहे.

Pardip Kurulkar
Pardip Kurulkar

Pradeep Kurulkar RSS Connection : पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या चर्चेत आहेत. कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप आहे. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने त्यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ कुरूलकर संघाच्या शाखेत 'सॅक्सोफोन' वाजवायचे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. कुरुलकर यांनी पूर्वी संघाची संस्था असेलल्या संस्कार भारतीमध्ये तेरा वर्षे संघटनमंत्री म्हणून काम केले. दरम्यान, पाकिस्तानी हेरांच्या जाळ्यात अकडल्याने संघ वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर त्यांची चर्चा सुरू झाली. वाद्यसंगीताचे उत्तम ज्ञान असलेले कुरुलकर यांनी संघाच्या घोष पथकामध्येही तब्बल १४ वर्षे सॅक्सोफोन वाद्य वाजवले, अशी माहिती समोर येत आहे.

नेमके प्रकरण काय?

डॉ. कुरुलकर यांनी ३ मे रोजी पुणे येथील डीआरडीओच्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये कार्यरत असताना पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाशी गोपनिय माहिती व्हॉटसअ‍ॅप व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलने शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा ठपका ठेवत संशयास्पद हालचालीवरून त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती एटीएसने दिली.

न्यायालयाने डॉ. कुरुलकर याला येत्या मंगळवारपर्यंत (९ मे २०२३) एटीएस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (रॉ) गुप्तचर यंत्रणेनेही डॉ. कुरुलकर याची चौकशी सुरू केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग