राष्ट्रवादीला धक्का.. माजी खासदार माजिद मेमन यांनी सोडला पक्ष, ट्विट करून सांगितले कारण
Majeed Memon Resign Ncp : राष्ट्रवादीचे माजी खासदार व शरद पवार यांच्या सर्वात जवळचे असणारे माजिद मेमन यांनी पक्ष सदस्यत्व तत्काळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मेमन यांनी ट्विट करून पक्ष सोडण्याचे कारण सांगितले आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे, कारण पवारांच्या सर्वात जवळच्या साथीदाराने त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन (Majeed Memon Resign Ncp Party) यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणासाठी आपण पक्ष सोडत असल्याचे माजिद मेमन यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
'१६ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तत्काळ सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षासोबत माझ्या शुभेच्छा कायम आहेत,' असं ट्वीट माजिद मेमन यांनी केलं आहे.
माजिद मेमन हे २०१४ ते २०२० या काळात राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार होते. तसंच ते कायदा आणि न्याय समितीचे सदस्यही होते. पेशाने वकील असलेल्या माजिद मेमन यांनी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्तेपद सांभाळले.
मोदींची स्तुती केल्याने आले होते चर्चेत -
माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याने ते चर्चेत आले होते. त्यांनी विरोधकांना सल्ला देताना म्हटले होते की, त्यांनी पीएम मोदींची लोकप्रियता पाहून विचार करायला हवा. त्यांनी म्हटले होते की, ईव्हीएममध्ये हेराफेरीच्या विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. मोदी दररोज २० तास काम करतात. हा त्यांचा असामान्य गुण आहे. यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते, असे मेमन म्हणाले होते.
संबंधित बातम्या