मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime News : 'मुस्लिमांवर कारवाई करा अन्यथा...', बाबा मच्छिंद्रनाथांची पोलिसांना धमकी!

Crime News : 'मुस्लिमांवर कारवाई करा अन्यथा...', बाबा मच्छिंद्रनाथांची पोलिसांना धमकी!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 11, 2022 03:11 PM IST

Crime News : प्रकरणात कारवाई न केल्यामुळं बाबा मछिंद्रनाथ यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात धुडगूस घातला, पोलिसांवरही हल्ला केल्यानं आता बाबा मछिंद्रनाथ यांना अटक करण्यात आली आहे.

National Crime News
National Crime News (HT)

National Crime News : मुस्लिमांविरोधात कारवाई न केल्यामुळं दिल्लीलगत असलेल्या गाझीयाबादमध्ये बाबा मछिंद्रनाथ यांच्या समर्थकांनी नंदग्राम पोलीस ठाण्यात धुडगूस घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबा मछिंद्रनाथ यांनी परिसरात मुस्लिमांविरोधातील काही वादात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्यानं बाबा मच्छिंद्रनाथ यांनी हिंडन नदीत उडी मारून जीव देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळं गाझीयाबादमधील नंदग्राम परिसरात तणावाचं वातावरण तयार झालं आहे.

बाबा मच्छिद्रनाथांच्या समर्थकांचा पोलिसांवर हल्ला....

मुस्लिमांवर कारवाई का होत नाहीये, याचा जाब विचारण्यासाठी बाबा मच्छिंद्रनाथ हे स्वत: पोलीस ठाण्यात आले होते, त्यावेळी संतापलेल्या त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केला, त्यात दोन पोलिसांनी गंभीर मार लागला असून एका पोलिसाचा गणवेश फाडला आहे. त्यामुळं आता पोलिसांनीही खाक्या दाखवत बाबा मच्छिंद्रनाथ यांच्यासह त्यांच्या १७ समर्थकांना अटक केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पोलिसांनी तीन प्रकरणांमध्ये आरोपींची बाजू घेऊन आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याला सोडून दिल्याचा आरोप बाबा मच्छिंद्रनाथ यांनी केला आहे. ते सर्व आरोपी मुस्लिम असून त्यांच्यावर कारवाई करा नाही तर मी नदीत उडी मारून जीव देईन, अशी धमकी बाबा मच्छिंद्रनाथ यांनी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केला आहे.

गाझीयाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदुंना पलायन करावं लागत असल्याचा आरोप बाबा मच्छिंद्रनाथ यांनी पोलिसांवर केला आहे. त्यामुळं संतापलेल्या मच्छिंद्रनाथ यांनी मंदिर बंद करून पोलीस ठाण्यातच आंदोलन सुरू केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्रनाथ यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जात असून जे यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग