मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Camel Cruelty: मादीला भेटून न दिल्यामुळं उंटाने केली मालकाची हत्या; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Camel Cruelty: मादीला भेटून न दिल्यामुळं उंटाने केली मालकाची हत्या; धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 07, 2023 01:46 PM IST

Camel Cruelty Case : उंटानं मालकाची हत्या केल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संतप्त जमावानं हल्लेखोर उंटावर हल्ला करत त्याचा ठार मारल्याची घटना समोर आली आहे.

Camel Cruelty Case In Bikaner Rajasthan
Camel Cruelty Case In Bikaner Rajasthan (HT)

Camel Cruelty Case In Bikaner Rajasthan : गोठ्यात आणलेल्या मादी उंटाला भेटून न दिल्यामुळं नर उंटानं आपल्याच मालकावर जीवघेणा हल्ला करत ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानातील बिकानेर शहरात ही घटना घडली असून मोहनराम नायक असं उंटाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. त्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी लाठीहल्ला केल्यामुळं हल्लेखोर उंटाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय उंटानं मालकावर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राजस्थानातील बिकानेरमध्ये एका तरुणानं दुसऱ्या गावातून मादी उंटाला आपल्या गोठ्यात आणून बांधलं होतं. त्यावेळी मालकाच्या नर उंटानं मादी उंटाजवळ जाण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु मालकांना उंटाला मादी उंटाकडे जाण्यापासून रोखल्यामुळं संतापलेल्या उंटानं थेट मालकावर हल्ला चढवला. उंटानं मालकाच्या खांद्याला आणि हाताला चावा घेत उचलून जमीनीवर आपटलं. त्यानंतर त्याच्या पोटावर पाय ठेवून उंट थेट मालकाच्या अंगावर बसला. त्यामुळं उंटाच्या हल्ल्यात मोहनराम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांना बेफाम झालेल्या उंटानं परिसरात धुगगूस घालण्याचा प्रयत्न करत अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी उंटावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत त्याचा ठार मारलं आहे.

उंटाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मोहनराम याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवला असून उंटाचंही अंत्यसंस्कार करण्यात आलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी उंटावर लाठी हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वीदेखील राजस्थानात उंटांनी माणसांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. परंतु यावेळी मादीला भेटू दिलं नाही म्हणून उंटानं आपल्याच मालकाचा जीव घेतल्याची घटना समोर आल्यामुळं संपूर्ण राजस्थानात खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point