मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  2000 notes : दोन हजारची नोट बंद झाल्याने लोक खूष; सर्वेक्षणातून समोर आलं 'हे' कारण

2000 notes : दोन हजारची नोट बंद झाल्याने लोक खूष; सर्वेक्षणातून समोर आलं 'हे' कारण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 25, 2023 09:07 AM IST

64 percent Indians do not have 2000 rupee note : देशात सुरू असलेल्या नव्या आर्थिक विकासाला नागरिक कसे पाहतात तसेच २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे लहान आणि मध्यम व्यवसायांना फटका बसणार आहे या बाबतचे सर्वेक्षण करण्यात आले असून यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

2000 note
2000 note

2000 rupee note : रिझर्व्ह बँकेने २ रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. १९ मे रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला. आरबीआयच्या घोषणेनंतर तेल, सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदीत तेजी आल्याचे वृत देखील पुढे आले. नागरिकांना या नोटबंदी बाबत काय वाटतं या बाबत लोकल सर्कलने सर्वेक्षण केले असून देशातील तीनपैकी ६४ टक्के नगरिकांकडे २ हजारांच्या नोटा नसून नागरिकांनी या नोटबंदीचे स्वागत केल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result Today : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट ! बारावीचा आज निकाल; 'या' ठिकाणी पाहा रिजल्ट

लोकलसर्कलने या नवीन आर्थिक विकासाकडे नागरिक कसे पाहतात आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना काही अडचणी येत आहेत का हे जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील ३४१ जिल्ह्यांतील ५७ हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. सर्वेक्षणानुसार ६४ टक्के लोक आरबीआयच्या नोटबंदीच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. तर केवळ २२ टक्के लोक २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यास विरोध करत आहेत. १२ टक्के लोकांनी काही फरक पडत नसल्याचे सांगितले तर २ टक्के लोकांनी या बाबत बोलण्याचे टाळले.

Narayngaon Tomato market : नारायणगाव बाजार समितीत लाल चिखल; एक किलो रुपये भाव मिळाल्याने टोमॅटो फेकून शेतकऱ्यांचा निषेध

६४ टक्के लोकांकडे २ हजाराच्या नोटा नाहीत

या सर्वेक्षणात ६४ टक्के लोकांनी २००० रुपयांच्या नोटा नसल्याचे सांगितले. तर ६ टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्याकडे १ लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या २००० रुपयांच्या नोटा आहेत. १५ टक्के लोकांकडे २०,००० रुपयांपर्यंत, तर ७ टक्के लोकांकडे २०,००० ते ४०,००० रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तर ४० टक्के लोकांना दोन हजाराच्या नोटांची माहिती द्यायची नाही.

३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा काढण्याच्या RBI च्या प्रस्तावित निर्णयामुळे काळा पैसा असणाऱ्यांना फायदा होईल असे ६८ टक्के नागरिकांचे मत आहे. तर केवळ १४ टक्के लोकांचा असा विश्वास आहे की ते या नोटा वापरू शकणार नाहीत. एकंदरीत, आरबीआयच्या या निर्णयामुळे काळा पैसाधारकांना फायदा होईल, असे बहुतांश लोकांचे मत आहे.

 

2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत मत

समर्थन ६४,

जलद २२%

फरक नाही १२%

२ % सांगू शकत नाही

लोकांकडे दोन हजाराच्या किती नोटा आहेत?

६४ % नाही

१५% २०,००० पर्यंत

२०-४० हजार ७ %.

४० हजार ते १ लाख ६ %

१ लाख ते २ लाख २ %

२ लाख ते १० लाख २ %

१० लाखाच्या वर २ %

निर्दिष्ट नाही २ %

RBI च्या घोषणेनंतर 2000 च्या नोटा खर्च करताना कुठे अडचणी आल्या?

पेट्रोल पंप ६ %

ज्वेलर्स ४%

औषध दुकान १३ %

किरकोळ दुकान १५ %

रुग्णालय ९%

सेवा देणारे ९%

ऑनलाइन COD ४ %

इतर १३ %

IPL_Entry_Point

विभाग