मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Winter Solstice: आजची रात्र तब्बल सव्वा तेरा तासांची, दिवस वर्षातील सर्वात लहान

Winter Solstice: आजची रात्र तब्बल सव्वा तेरा तासांची, दिवस वर्षातील सर्वात लहान

Dec 22, 2023 04:57 PM IST

22 December longest night: २२ डिसेंबरला दिवस लहान आणि रात्र मोठी का असते, हे जाणून घेऊयात.

22 December longest night
22 December longest night (Rupjyoti Sarmah)

22 December shortest day: हिवाळ्यात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. २२ डिसेंबर हा वर्षांतील सर्वात लहान दिवस असतो. या दिवशी दिवस पावणे अकरा तासांचा आणि रात्र तब्बल सव्वा तेरा तासांची असते. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या २३.५ अंशांनी कललेला असल्याने हे घडते.२२ डिसेंबरच्या दिवशी सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे असतो. यावेळी उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात कमी अर्थात दिवस सर्वात लहान असतो. यानंतर पुढे सूर्य उत्तर बाजूस सरकत जातो, यालाच उत्तरायण म्हणतात. ही प्रक्रिया २१ जूनला पूर्ण होते, ज्याला वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून ओखळले जाते.

दक्षिणायनाची मकरवृत्त असते. सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्याच्या भासमान मार्गाला उत्तरायण, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा मार्गाला दक्षिणायन म्हणतात. दरम्यान, २१ आणि २२ जूनला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो. तर, २१ आणइ २२ डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. यामुळेच २१ जूनच्या दिवशी दिवस मोठा असतो. तर, २२ डिसेंबरच्या दिवशी रात्र मोठी असते.

दरम्यान, नागपूर, चंद्रपूर, मुंबई आणि पुण्यात रात्र किती मोठी आणि दिवस किती लहान असेल हे जाणून घेऊयात. नागपूरमध्ये १० तास ४८ मिनिटांचा दिवस असेल आणि १३ तास १२ मिनिटांची रात्र असेल. चंद्रपुरात दिवस १० तास ५३ मिनिटे आणि रात्र १३ तास ०७ मिनिटांची असेल. मुंबईत १० तास ५६ मिनिटांचा दिवस असेल . तर, १३ तास ०३ मिनिटांची रात्र असेल. याचबरोबर पुण्यात आज १० तास ५८ मिनिटांचा दिवस असेल आणि रात्र १३ तासांची असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मानवी शरिरावर काय परिणाम होतो?

मानवाचे शरीर एका जैविक घड्याळासारखे असते, ज्यांना वातावरणानुसार स्वत:मध्ये बदल करावा लागतो. तसेच अॅडजस्ट करावे लागते. झोपेचे वेळापत्रक बदलमुळे मूड बदलतो, डोकेदुखी आणि उदासीनता जाणवते. पचनाच्या समस्याही उद्भवतात.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर