मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा जास्त कोरडी होते? आंघोळीनंतर लावा या गोष्टी

Winter Skin Care: हिवाळ्यात त्वचा जास्त कोरडी होते? आंघोळीनंतर लावा या गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Dec 22, 2023 01:45 PM IST

After Bath Skin Care: हिवाळ्यात त्वचेची काळजी अधिक घ्यावी लागते. त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ती कोरडी होते. हे टाळण्यासाठी आंघोळीनंतर या गोष्टी लावा.

आंघोळीनंतर त्वचेवर लावायच्या गोष्टी
आंघोळीनंतर त्वचेवर लावायच्या गोष्टी (unsplash)

Things to Apply After Bath for Dry Skin: हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता नष्ट होते आणि त्वचा कोरडी होते. हिवाळ्यात त्वचेवरील चमक निघून जाते आणि त्वचा निर्जीव बनवते. आंघोळीनंतर चेहऱ्यावर लगेचच मॉइश्चरायझर लावले नाही तर कोरडेपणा अधिक दिसून येतो. अशा स्थितीत जाणून घ्या आंघोळीनंतर लगेचच चेहऱ्यावर काय लावावे, जेणेकरून त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि ती चमकेल. हिवाळ्यात याचा नियमित वापर केला पाहिजे.

ट्रेंडिंग न्यूज

आंघोळीनंतर त्वचेवर लावा या गोष्टी

तूप वापरा

तुम्ही आंघोळीनंतर लगेच चेहऱ्यावर तूप लावू शकता. जर तूप घरी बनवलेले असेल तर जास्त फायदे मिळतात. तुपात अँटी-फंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे लावल्याने त्वचा ग्लोइंग आणि सॉफ्ट होते.

दुधाची साय लावा

दुधाची साय त्वचेवर लावल्याने त्वचा सॉफ्ट होते. दुधाच्या सायीने चेहऱ्यावर हलकी मसाज केल्यास फायदा होतो. त्यामुळे कोरडेपणाही कमी होतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सायसोबत एलोवेरा जेल मिक्स करुन लावू शकता.

खोबरेल तेल

हे सर्वात प्रभावी मानले जाते. हातावर थोडेसे तेल घेऊन चोळा आणि ते चेहऱ्यासह शरीराच्या इतर भागावर लावा आणि हलका मसाज करा. तुम्ही हे आंघोळीनंतर वापरू शकता. तसेच आंघोळीपूर्वी सुद्धा हे तेल लावू शकता. आंघोळीच्या आधी हे तेल लावा आणि नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. साबण न वापरण्याची काळजी घ्या. तुम्ही सरसोचे तेल किंवा मोहरीचे तेल सुद्धा वापरू शकता. दोन्ही तेल त्वचेसाठी चांगले म्हटले जातात.

 

बदामाच्या तेल आणि गुलाब जल

एक चमचा गुलाब जलमध्ये पाच थेंब बदाम तेल मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. आंघोळीनंतर लगेच असे केल्याने कोरडेपणा दूर होईल आणि त्वचा चमकदार दिसेल. त्वचेसाठी बदामाचे तेल फायदेशीर असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग