मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kandivali Mumbai Firing : मुंबईच्या कांदिवलीत तुफान गोळीबार, व्यापाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू

Kandivali Mumbai Firing : मुंबईच्या कांदिवलीत तुफान गोळीबार, व्यापाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 28, 2023 12:29 PM IST

Kandivali Mumbai Firing : मुंबईतील कांदिवली परिसरात अज्ञात आरोपीने बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kandivali Mumbai Firing News
Kandivali Mumbai Firing News (HT_PRINT)

Kandivali Mumbai Firing News : काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीतील लालजी पाडा परिसरात अज्ञात आरोपीने तुफान गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून गोळीबारात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात आरोपीने नेमका कशासाठी गोळीबार केला, त्यामागे काय कारण होतं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आरोपीने गोळीबार करत तरुणाची हत्या करून घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं मुंबईत खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या कांदिवली परिसरातील लालजी पाडा परिसरात सकाळी अचानक एका व्यक्तीने गोळीबार करायला सुरुवात केली. त्यावेळी नागरिकांमध्ये जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ उडाली. आरोपीच्या गोळीबारात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू आहे. मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

कांदिवलीतील गोळीबारात मृत्यूमुखी पडलेला तरुण टँकरचा व्यवसाय करत होता. या व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता कांदिवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षी कांदिवलीतील लालजी पाडा परिसरात गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांदिवलीत पुन्हा गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं राजधानी मुंबईत खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point