मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला संपवले; दोन महिन्यांच्या तपासानंतर ‘असा’ उघडकीस आला गुन्हा

प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला संपवले; दोन महिन्यांच्या तपासानंतर ‘असा’ उघडकीस आला गुन्हा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 03, 2022 10:13 AM IST

Mumbai Crime News: विवाहबाह्य संंबंधांतून एका महिलेनं ४५ वर्षीय पतीचा विष घालून खून केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे.

Crime news
Crime news

Woman, lover arrested for poisoning husband: प्रियकराच्या मदतीनं स्वत:च्या नवऱ्याला विष देऊन ठार केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या प्रियकराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

कमलकांत शहा (४५) असं विष देऊन मारण्यात आलेल्या इसमाचं नाव आहे. तो सांताक्रूझ पश्चिम येथील रहिवासी होता. त्याचा कपड्यांचा व्यवसाय करत होता. २००२ मध्ये कविताचं त्याच्याशी लग्न झालं होतं. त्यांना एक मुलगी (वय २०) आणि १७ वर्षांचा एक मुलगा आहे. कमलकांतचा मित्र असलेल्या हितेश जैन याच्यासोबत कविताचे विवाहबाह्य संबंध होते. तब्बल दहा वर्षे त्यांचे हे संबंध होते. त्यावरून कविता आणि कमलकांत यांच्यात सतत वाद व्हायचा. कविता आणि हितेशला लग्न करून कमलकांतची संपत्ती बळकवायची होती, असं तपासात समोर आलं आहे. जून महिन्यात कमलकांतच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर कविता आणि हितेशनं मिळून कमलकांतला संपवायचा कट रचला. त्यांनी त्याच्या अन्नात आर्सेनिक मिसळण्यास सुरुवात केली. अनेकदा विषप्रयोग केला. त्यामुळं कमलकांतची तब्येत बिघडली. हितेशनं त्याला २७ ऑगस्ट रोजी अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर ३ सप्टेंबरला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथं १९ सप्टेंबरला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयानं कमलकांतच्या मृत्यूची माहिती सांताक्रूझ पोलिसांना दिली होती. त्यावर पोलिसांनी कमलकांतच्या बहिणीचा जबाब नोंदवला होता. कमलकांतचा मृत्युमागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय तिनं व्यक्त केला होता. पोलिसांनी आकस्मिक निधन अशी नोंद करून हा तपास गुन्हे शाखेच्या युनिट ९ कडे सोपवला. युनिट ९ ने कमलकांतचे नातेवाईक, मित्रमंडळींचे जबाब नोंदवण्यात आले. कमलकांतच्या वैद्यकीय अहलावानुसार, त्याच्या शरीरात थॅलियम आणि आर्सेनिकचे अंश आढळले होते. त्यानंतर हाती आलेले परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक व वैद्यकीय तपशीलाच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी कविता आणि हितेशला अटक केली. युनिट ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय खताडे यांनी हिंदुस्तान टाइम्सला ही माहिती दिली.

IPL_Entry_Point

विभाग