मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ACB Action : दीड लाखांची लाच घेणारा शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Action : दीड लाखांची लाच घेणारा शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 02, 2022 01:42 PM IST

ACB Action against bribe in Pune : पुण्यात शिवाजी नगर कोर्टात एका लिपिकाने प्रकरण निपटवण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागितली असून त्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे.

लाच घेताना पुण्यात एकाला अटक
लाच घेताना पुण्यात एकाला अटक (HT_PRINT)

पुणे : गुन्हा दाखल असलेल्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी तब्बल दोन लाखाची लाच मागून दीड लाख रक्कम स्वीकारतांना जिल्हा न्यायालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) अटक केली. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अशोक देठे (वय ३८, रा.राजगुरुनगर, खेड) असे अटक केलेल्या लिपीकाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "एसीबी"च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या मावस भावाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांच्या मावस भावाची संबंधित प्रकरणात मदत करण्यासाठी व या प्रकरणातून सुटका करण्यासाठी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात लिपिक असलेल्या देठे याने तक्रारदाराकडे ३० नोव्हेंबर रोजी २ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती दिड लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. दरम्यान, तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.

एसीबीच्या पथकाने या प्रकरणाची पडताळणी केली. त्यांनतर १ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गणेश झेरॉक्स दुकानासमोर देठे याने दिड लाख रुपयाची लाच घेतली. त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी देठे यास रंगेहात अटक केली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग