मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur: नागपूर पोलिस आता गुन्हेगारांबरोबर भटक्या कुत्र्यांवर देखील नजर ठेवणार; नव्या परिपत्रकाची सर्वत्र चर्चा

Nagpur: नागपूर पोलिस आता गुन्हेगारांबरोबर भटक्या कुत्र्यांवर देखील नजर ठेवणार; नव्या परिपत्रकाची सर्वत्र चर्चा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 02, 2022 01:29 PM IST

Nagpur News : नागपूर पोलिसांना आता गुन्हेगारांसोबतच भटक्या कुत्र्यांवर देखील नजर ठेवावी लणार आहे. एवढेच नाही तर त्याची गणना देखील पोलिसांना कारवाई लागणार आहे.

नागपूर पोलिस आता गुन्हेगारांबरोबर भटक्या कुत्र्यांवर देखील नजर ठेवणार
नागपूर पोलिस आता गुन्हेगारांबरोबर भटक्या कुत्र्यांवर देखील नजर ठेवणार

नागपूर : शहरात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ही पोलिसांनी असते. त्यांना गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई देखील कारवाई लागते. मात्र, आता या पोलिसांना गुन्हेगारांसोबतच शहरातील कुत्र्यांवर देखील नजर ठेवावी लागणार असून त्यांची गणणा देखील कारवाई लागणार आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनसाठी असे परिपत्रक जारी केले आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम ४४ अंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात किती मोकाट कुत्रे आहेत, याबाबत शहानिशा करुन त्याबद्दलची माहिती तयार करण्याचे आदेश दिले. ही माहिती पुढील कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणेला द्यावी असे या परिपत्रकात लिहिलेले आहे. गेल्या तीन वर्षात किती मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना चावे घेतले आहेत, भटक्या कुत्र्यांच्या किती तक्रारी मिळाल्या याची सर्व माहिती आता नागपूर पोलिसांना मिळवावी लागणार आहे. या सोबतच भटक्या कुत्र्यांना कोण खायला घालतं यावरही पोलिसांना लक्ष ठेवावे लागणार आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस स्टेशनसाठी जारी केलेल्या या परिपत्रकाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर दंड आकरन्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नागरिकांच्या विरोधनंतर हा निर्णय रद्द करण्यात आला होता. दरम्यान, नागपूरमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नसबंदी आणि अॅन्टी रेबीज वॅक्सिन लावण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) ला सुरुवात होणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग