मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Murder Case : पत्नीला सांगून तरुणींसोबत सेक्स करायचा; संतापलेल्या महिलेनं पतीलाच कायमचं संपवलं

Murder Case : पत्नीला सांगून तरुणींसोबत सेक्स करायचा; संतापलेल्या महिलेनं पतीलाच कायमचं संपवलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 04, 2023 10:24 PM IST

Satara Murder Case : विवाहबाह्य संबंधाला कंटाळून महिलेनं आपल्याच पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satara Crime News Marathi
Satara Crime News Marathi (HT_PRINT)

Satara Crime News Marathi : सततच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळलेल्या महिलेनं आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेनं पतीच्या हत्येची सुपारी दिल्यानंतर पाच जणांनी साताऱ्यात भरदिवसा अमित आबासाहेब भोसले यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात अमित भोसलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत गोव्यातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळं आता या थरारक घटनेनंतर महिलेनंच आपल्या पतीचा काटा काढल्याची घटना समोर आल्यामुळं साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या गोळीबारात मृत पावलेला अमित भोसलेचं अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. महिलांशी प्रेमप्रकरण करत तो स्वत:च्याच पत्नीला सातत्यानं मारहाण करायचा. इतकंच नाही तर पत्नीला सांगून तरुणीसोबत सेक्स करायला जायचा. त्यामुळं संतापलेल्या पत्नी आपल्याच पतीला ठार मारायची प्लॅनिंग आखली. जिल्ह्यातील काही आरोपींना महिलेनं अमितच्या हत्येची सुपारी दिली. त्यानंतर २४ जानेवारीला बाईकवरून आलेल्या आरोपींनी पुणे-कोल्हापूर रोडवर अमितवर गोळ्या घालून त्याची हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना गोव्यातून अटक केली आहे.

अमितची हत्या केल्यानंतर पाचही आरोपी महाराष्ट्रातून पळून गेल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपींचा माग घेतला. त्यानंतर सातारा पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीनं अमित भोसले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपींनी हत्येची कबुली दिली असून पोलिसांनी मृत अमित भोसले याच्या पत्नीची आणि मुलाची चौकशी सुरू केली आहे.

Alabama America : चक्क विद्यार्थीनीशी कॉलेजमध्ये केला सेक्स; धक्कादायक प्रकारानंतर शिक्षकाला अटक

IPL_Entry_Point