मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ShivSena-Vanchit Alliance : वंचितसोबत युती करण्याचं कारण काय?, उद्धव ठाकरे म्हणाले...

ShivSena-Vanchit Alliance : वंचितसोबत युती करण्याचं कारण काय?, उद्धव ठाकरे म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 23, 2023 10:37 PM IST

ShivSena-Vanchit Alliance : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत सुंयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray on vanchit bahujan aaghadi and shivsena alliance
Uddhav Thackeray on vanchit bahujan aaghadi and shivsena alliance (HT)

Uddhav Thackeray on vanchit bahujan aaghadi and shivsena alliance : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची बोलणी सुरू होती. ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात राजकीय युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन्ही नेत्यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेनं थेट वंचितशी युती करण्याचा निर्णय का घेतला?, दोन्ही पक्षांची आगामी काळात वाटचाल कशा पद्धतीची राहणार आहे?, याबाबातचा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशातील जनतेला नको त्या वादात अडकवून हुकूमशाहीनं कारभार केला जात आहे. लोकशाही जिंवत ठेवण्यासाठी आणि वैचारिक प्रदूषणातून जनतेला मोकळा श्वास देण्यासाठी शिवसेनेनं वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. निवडणुका आल्या की गरिबांचा उदोउदो करायचा आणि मतदान संपल्यानंतर गरिबांना रस्त्यावर आणलं जात आहे. देशातील घाणेरडं राजकारण संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत युतीची घोषणा केली आहे.

सेना-वंचित युतीची वाटचाल कशी असेल?

आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीनं युती केली असून आगामी काळात काय-काय करता येईल, याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र आणि देशात जे सुरू आहे, ते तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगत ठाकरेंनी युतीच्या भविष्याची संकल्पना स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र राज्याची सत्ता फक्त ३६९ घराणी आणि काही भांडवलदारांच्या हातात असून राजकीय व्यवस्थेत सामाजिकीकरण करण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती करत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

IPL_Entry_Point