मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  SSC Hall Ticket: दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट मिळणार; 'या' बेवसाईटवरून करा डाऊनलोड

SSC Hall Ticket: दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट मिळणार; 'या' बेवसाईटवरून करा डाऊनलोड

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2023 01:19 PM IST

SSC Hall Ticket Updates: इयत्ता दहावीच्या परीक्षेला अवघा एक महिना शिल्लक राहिला असून येत्या २ मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे.

MPSC Student
MPSC Student

Where To Downlod SSC Exam Hall Ticket: इयत्ता दहावीच्या परीक्षेला अवघा एक महिला उरला असून आजपासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. येत्या 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत परीक्षा पार पडणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हॉल तिकिटाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, 2 मार्चपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आज दुपारी ३ वाजल्यापासून हॉल तिकिट उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://www.mahahsscboard.in या अधिकृत बेवसाईटवरून हॉल तिकिट डाऊनलोड करता येईल.

विद्यार्थ्यांना आपपल्या शाळेतून हॉल तिकीट मिळेल.सदर शाळांनी हॉल तिकीट ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करून विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेता मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तसेच दहावीचे वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी SSC Exam Timetable या लिंकवर क्लिक करावी

IPL_Entry_Point

विभाग