मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : पुण्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यासाह गारपीट, हवामान विभागाचा यलो अलर्ट

Pune Rain : पुण्याला पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यासाह गारपीट, हवामान विभागाचा यलो अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 15, 2023 04:18 PM IST

Pune Rain : पुण्यात दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाने तूफान हजेरी लावली. अनेक भागात पाऊस तर काही भागात गारपीट झाली.

Pune Rain :
Pune Rain :

पुणे : पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने झोपडले. अनेक भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस झाला. तर काही भागात गारपीट झाली. हवामान विभागाने पुणे आणि परिसरात यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी दुपार नंतर घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरात सलगतिसऱ्या दिवशी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. बिबेवाडी, सहकार नगर, स्वारगेट, धनकवडी परिसरात गारपीट झाली तर येरवडा आणि लोहगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. ऊरुळी देवाची, सुस, बानेर, पाषाण परिसरातही पावसाने वीजांच्या गडगडासह हजेरी लावली. या पावसामुळे पुणेकरां त्रेधा उडाली आहे.

paus
paus

पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठा आणि सिंहगड रस्त्यावर दुपार नंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती.

हवामान विभागाने दुपारी पुण्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार अलर्ट देखील जाहीर करण्यात आला होता. दुपार नंतर नागरिकांनी शक्यतोवर घरी राहावे असे आवाहन करण्यात आले होते. तसेच पावसात झाडाखाली थांबू नये असे आवाहन देखील करण्यात आले होते. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. यामुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता.

IPL_Entry_Point

विभाग