मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : “आमदारांनी नाही, तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”, नारायण राणेंचा प्रहार

Narayan Rane : “आमदारांनी नाही, तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”, नारायण राणेंचा प्रहार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 30, 2022 05:22 PM IST

आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. तर स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यभरातील शिवसेना पदाधिकारी व जिल्हा प्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) गणेशोत्सवानंतर राज्य दौऱ्यावर निघणार आहे. त्यातच दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण तापवलं जात आहे. उद्धव यांच्याकडे दसरा मेळाव्यात बोलण्यासारखं काय आहे?असा सवाल नारायण राणे यांनी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

उद्धव ठाकरे शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. तर स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केले ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केल्याची टीका राणे यांनी केली आहे. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले व मुख्यमंत्री बनले, अशी टीका राणे यांनी केली आहे.  

शिवसेनेचा पलटवार -

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची सब कंत्राटे भाजपने काढली आहेत. ही सब कंत्राटे मिळवण्यासाठी अनेक नेते फार उतावीळ झाले असून नवनीत राणा, नारायण राणे आणि राज ठाकरे ही सगळी मंडळी कंत्राट मिळवण्यासाठी फार उत्सुक आहेत. आम्हाला याचा अभिमान आहे की, मुख्यमंत्री पदावर नसतानाही उद्धव ठाकरेंमुळे राजकीय रोजगार हमी योजनेची कामे या सगळ्यांना मिळत आहेत. या शब्दांत सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 

IPL_Entry_Point