मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Coronavirus: विदर्भात कोरोनाचा स्फोट, खासगी शाळेतल्या ३८ विद्यार्थ्यांना बाधा

Coronavirus: विदर्भात कोरोनाचा स्फोट, खासगी शाळेतल्या ३८ विद्यार्थ्यांना बाधा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 18, 2022 01:55 PM IST

Corona Update In Nagpur : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन कोरोना महामारी संपत असली तरी विदर्भात मात्र कोरोनाच्या केसेस वाढत असल्याची स्थिती आहे.

Corona Update In Nagpur
Corona Update In Nagpur (HT)

Nagpur Covid Cases Today : महामारी संपल्यानंतरही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनानं डोकं वर काढलं आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढताना पाहायला मिळत आहे. विदर्भात कोरोनाच्या केसेस वाढत असतानाच आता नागपूरातील एका खाजगी शाळेत तब्बल ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून प्रशासनानं उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.

काय आहे नागपूरातील कोरोनाची परिस्थिती?

नागपूरात एका दिवसात तब्बल २६२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं कोरोना संसर्गवाढीचा वेग पाहता प्रशासनही कामाला लागलं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढणं ही शहरासाठी आणि विदर्भासाठी धोक्याची घंटा असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे.

खाजगी शाळेत ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा...

नागपूरातील हिंगणा रोडवरील एका खाजगी शाळेत तब्बल ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. खाजगी शाळेत इतक्या मोठ्या प्रमाणात मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे. संबंधित शाळेतील मुलांची १५ जुलैला आरटीपीसीआर करण्यात आली होती. त्यानंतर १६ जुलैला त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याचं जोशी यांनी सांगितलं.

हे प्रकरण जरी समोर आलेलं असलं तरी सरसकट कोणत्याही शाळेची तपासणी करण्यात येणार नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय पालकांनी आणि शाळांच्या संचालकांनी विनंती किंवा मागणी केली तरच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, असंही आयुक्त जोशी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आता नागपूरातील ज्या शाळेत ३८ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले होते, ती शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केल्याशिवाय शाळा सुरू केली जाणार नसल्याचं शाळेच्या संचालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग