मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  TET Scam: अब्दुल सत्तारांच्या मुली बोगस शिक्षकांच्या यादीत; प्रमाणपत्रे रद्द

TET Scam: अब्दुल सत्तारांच्या मुली बोगस शिक्षकांच्या यादीत; प्रमाणपत्रे रद्द

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 08, 2022 10:33 AM IST

टिईटी घोट्याळात पुणे सायबर पलिसांनी कारवाई करत तब्बल ७ हजार ८७४ उमेदवार बोगस पद्धतीने पास झाल्याचे उघड झाले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्या सर्वांची प्रमाणपत्रे रद्द केली जाणार आहेत. या या यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुलींची नावे असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

माजी मंत्री अब्दुल सत्तार
माजी मंत्री अब्दुल सत्तार

पुणे : पुण्यात TET घोटाळ्या प्रकरणी सायबर पोलिसांनी कारवाई करत परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करण्यात आली यात जवळपास ७ हजार ८८९ उमेद्वार हे बोगस असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परिपत्रक काढत कारवाईचे आदेश दिले असून या सर्वांवर कारवाई होणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या घोटाळीच्या लाभार्थी या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली असल्याची माहिती पुढे आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांची प्रमाणपत्रे रद्द केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यात TET घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा गैरकारभार झाल्याचा संशय होता. TET चा २०१९ चा शेवटचा निकाल २८ ऑगस्ट २०२० रोजी परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६ हजर उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी अनेक उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. २९ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले असल्याचे यात समोर आले. तर उर्वरीत ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात होते, असे आढळून आलेले आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर तपास सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन मुलींनीही या परीक्षेत गैरकारभर केला असून चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्रे मिळवल्याची माहिती पुढे आली आहे.

या ७ हजार ८७४ बोगस विद्यार्थ्यांमध्ये या दोघींचा समावेश आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी त्यांची नावे असून सध्या एका शिक्षण त्या संस्थेत कार्यरत आहेत. १०२ आणि १०४ क्रमांकावर त्यांची नावं आहेत. या बातबचे वृत दैनिक सामना ने दिले आहे. सत्तार यांच्या जवळपास ७ शिक्षण संस्था आहेत. या घोटाळ्यात आढळलेले सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश परीक्षा परिषदेने दिले आहेत.

या वर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार म्हणाले, माझी बदनामी करण्यासाठी हा सगळा कट रचण्यात येत आहे. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा या प्रकरणाची नीट चौकशी व्हावी. कुणाचीही बदनामी करण्याचं काम कुणी करु नये.

 

 

 

<p>TET घोटाला&nbsp;</p>
TET घोटाला&nbsp;
IPL_Entry_Point

विभाग