मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अंथरुणाला खिळलेल्या आमदारांना विमानाने मतदानासाठी नेणं हा भाजपचा स्वार्थीपणा : अजित पवार

Ajit Pawar : अंथरुणाला खिळलेल्या आमदारांना विमानाने मतदानासाठी नेणं हा भाजपचा स्वार्थीपणा : अजित पवार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 13, 2023 05:14 PM IST

Ajit Pawar rally in Chinchwad : पुण्यात पोटनिवडणुकीचा धुरळा उडाला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते आज जमले आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar (HT)

पुणे : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. आज महाविकास आघाडीचे चिंचवड येथील उमेदवार नाना काटे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जाहीर सभा भेटली. या सभेत अजित पवारांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला, अजित पवार म्हणाले, लक्ष्मण जगताप यांना भाजपने आपल्या स्वार्थासाठी मतदान कर्णीसाठी विमानाने नेले. त्यामुळेच त्यांची दगदग झाली. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता न्यायला नको होतं. जगताप हे आजारी असतांना मीच त्यांना महागडी इंजेक्शनं आणि औषध आणून दिली.

पवार म्हणाले, आपल्याला चिंचवड, कसबा पेठ आणि चिंचवड येथील ही निवडणूक जिंकायची आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा आपल्या विचारांच्या निवडून आलेल्या आहेत. म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटाला त्यांना त्यांची जागा समजलेली आहे. मात्र आपल्यासाठी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणूक महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, ज्या प्रकारे पायऊतार व्हावे लागले, त्याचा बदला शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीतून घ्यायचा आहे. मी मागील ३० ते ३२ सालापासून काम करत आहे. याच शहराने मला १९९१ साली पहिल्यांदा खासदार केले होते,” असे अजित पवार म्हणाले.

 

IPL_Entry_Point

विभाग