मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare : संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? सुषमा अंधारेंनी ठोकला तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

Sushma Andhare : संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? सुषमा अंधारेंनी ठोकला तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2023 05:51 PM IST

Sushmaandhare : सुषमा अंधारे यांनी आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Sushma andhare and Sanjay shirsat
Sushma andhare and Sanjay shirsat

शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट एका वक्तव्यामुळे अडचणीत येऊ शकतात. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबद्दल बोलत असताना त्यांनी एक बेताल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आज (गुरुवार) संजय शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारेंवर टीका करत असताना संजय शिरसाट यांनी खालच्या पातळीचे वक्तव्य केलं होते. शिरसाट म्हणाले होते की, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत.” या वक्तव्या विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला असून संजय शिरसाट यांना ते वक्तव्य भोवणार असल्याचं बोललं जात आहे.

सुषमा अंधारे यांनी पुण्यातील न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ही लढाई कोणत्याही आर्थिक लाभासाठी नाही तर केवळ महिलांच्या सन्मानासाठी आहे. महिलांबद्दल अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला चाप बसावा यासाठी ही लढाई आहे. महाराष्ट्रातील लेकी-बाळींबद्दल, महिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य आणि अभद्र बोलणाऱ्या शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराला समज देणे हा एकच यामागे उद्देश आहे.

तीन रुपयांचाच दावा का ठोकण्यात आला, याबद्दल विचारण्यात आल्यावर अंधारे म्हणाल्या,मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. त्याचबरोबर अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. लाखो कोटी रुपयांमध्येही करता येत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात नको. मी भटक्या विमुक्तमधून येते.

 

आमच्याकडे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान करणं हा सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून गुन्हेगाराला तीन रुपयांचा दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जाते.

IPL_Entry_Point