मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule : भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

Supriya Sule : भुजबळ साहेब कर्तृत्वानं मोठे, पण...; सुप्रिया सुळेंनी कौतुक करत हाणला टोला

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 27, 2023 06:31 PM IST

Supriya Sule taunt Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात सुरु असलेल्या वादात सुप्रिया सुळेंनी उडी घेतली.

Supriya Sule and Chhagan Bhujbal
Supriya Sule and Chhagan Bhujbal

Maharashtra Politics: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास छगन भुजबळांनी विरोध दर्शवला. याचबरोबर मराठा समाज मागासच नाही असं सांगत शिंदे समिती बरखास्त करा, अशी मोठी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "भुजबळ साहेब हे वयाने आणि कर्तृत्त्वाने मोठे आहेत. मला काही बोलायचे आहे. मात्र, त्यामुळे कोणताही गैरसमज करुन घेऊ नयेत. छगन भुजबळ यांनी त्यांची मागणी सरकारकडे मांडावी. ज्या मागण्या व्यासपीठावर केल्या जात आहे, त्या बंद दरवाजामागे किंवा कॅबिनेटच्या बैठकीत मांडल्या तर बरे होईल."

सु्प्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "राज्यात गलिच्छ राजकारण सुरु आहे, ज्याला खोके सरकार जबाबदार आहे. या सरकारमध्ये भुजबळांना महत्त्वाचे पद मिळाले आहे. सरकारमध्ये २०० आमदार असताना त्यांच्या मंत्र्याला बोलायला बाहेरचे व्यासपीठ लागत आहे. सरकारमध्ये मिसमॅनेजमेंट दिसते आहे",अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

“महाष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. कारण, राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यासाठी केंद्राकडे २ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ताबडतोब दिल्लीहून एक टीम महाराष्ट्रात बोलवा. तीन दिवसांत तलाठी आणि कलेक्टर कामे करावीत. ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याठिकाणी सरसकट कर्जमाफी द्यावी”, अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली आहे.

IPL_Entry_Point