मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kalyan Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं जन्मदात्या आईची हत्या, बेवड्या डॉक्टरला अटक

Kalyan Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं जन्मदात्या आईची हत्या, बेवड्या डॉक्टरला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 08, 2022 12:27 PM IST

Kalyan crime news : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं डॉक्टरनं आपल्याच आईचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Kalyan Crime News In Marathi
Kalyan Crime News In Marathi (HT_PRINT)

Kalyan Crime News In Marathi : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळं आपल्याच जन्मदात्या आईची हत्या करण्यात आल्याची घटना कल्याणमधून समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. आरोपीनं बीएएमएस केलेलं असून गेल्या अनेक दिवसांपासून तो बेरोजगार होता. काम मिळत नसल्यानं त्याला दारू पिण्याची सवय लागलेली होती. त्यानंतर त्यानं दारू पिण्यासाठी आईला पैसे मागायला सुरुवात केली होती. परंतु आईनं पैसे द्यायला नकार दिल्यानं त्यानं थेट आईची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील हनुमान नगरमध्ये राहणारा आरोपी रवी पुमनी (३४) या डॉक्टरला काम नसल्यानं दारू पिण्याची सवय लागलेली होती. त्यामुळं तो गेल्या अनेक दिवसांपासून आई सरोजाला (६४) दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. आईकडे पैसे नसल्यानं तो सातत्यानं आईसोबत भांडणं करत होता. परंतु रविवारी त्यांच्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडणं झाले. त्यावेळी संतापलेल्या डॉक्टरनं आपल्याच आईचा गळा आवळून हत्या केली.

आईची हत्या केल्यानंतर आरोपी रवीनं याबाबतची माहिती त्याच भागात राहणाऱ्या बहिणीला दिली. परंतु त्यानं बहिणीला आईनं आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मृत सरोजा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येची नोंद केली होती.

परंतु आरोपी रवीच्या बहिणीला ही आत्महत्या नसल्याचा संशय असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता ही आत्महत्या नसल्यानं समोर आलं. शवविच्छेदनाचा रिपोर्ट समोर आल्यानंतर सरोजा यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी रवीला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई केली जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग