मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  NCP BJP Alliance : भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांवरून शिंदे गटात अस्वस्थता? संजय शिरसाट म्हणाले...

NCP BJP Alliance : भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांवरून शिंदे गटात अस्वस्थता? संजय शिरसाट म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 17, 2023 02:53 PM IST

NCP And BJP Alliance : राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर शिंदे गटाने सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat On NCP And BJP Alliance
Sanjay Shirsat On NCP And BJP Alliance (HT)

Sanjay Shirsat On NCP And BJP Alliance : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं आता भाजप-राष्ट्रवादीची युती झाल्यास शिंदे गटाचं काय होणार?, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. त्यानंतर आता या चर्चांवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मौन सोडलं आहे. अजित पवार आणि अमित शहा यांच्यातील भेट नियोजित होती, त्यामुळं भाजपला कुणासोबत युती करायची हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरेंची त्यांच्या कार्यकर्त्यांनीच वाजवलेली आहे, हे शरद पवारांना चांगलंच माहिती आहे. याशिवाय शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची वाजवलेली आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे सर्वांना माहिती आहे. अजित पवारांच्या संभावित बंडाला शरद पवारांची मूक संमती असून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही पवारांचीच माणसं असून त्यांना कातडी वाचवायची आहे, त्यामुळं ते भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ इच्छितात, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : राज्यात पुन्हा सत्ताबदलाच्या हालचाली, अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द

आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही- शिरसाट

भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. राष्ट्रवादी हा घात करणारा पक्ष असून तो थेट भाजपबरोबर जाणार नाही. ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात, परंतु थेट त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीला काही तरी पर्याय हवा असल्यामुळंच त्यांच्याकडून हालचाली सुरू असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point