मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 01, 2022 10:52 PM IST

शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का

मुंबई - शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे हकालपट्टीची कारवाई केल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्षाचे ४० हून अधिक आमदार फोडले. त्यानंतर सुरत गाठले. सूरतनंतर गुवाहाटी येथे मुक्काम ठोकला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही हकालपट्टीची कारवाई केली आहे. पक्षाने एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे सदस्यही नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. 'तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून दूर करत आहे', असे उद्धव ठाकरेंनी पत्रात लिहिले आहे. एक परिपत्रक जारी करत त्यांनी हा आदेश दिला आहे.

शिंदे गटाची प्रतिक्रिया -

 पक्षाविरोधी कारवाई केल्याचं कारण देत, त्यांना सेनेच्या नेते पदावरून हटवलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांना सेनेच्या नेते पदावरून हटवल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ज्यावेळी एखादे नेते मुख्यमंत्री असतात, तेव्हा ते सभागृहाचे नेते असतात, ते महाराष्ट्राचे नेते असतात. त्यामुळे आता तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही मागे हटणार नाही. एकनाथ शिंदे आता विधीमंडळाचे नेते बनले आहेत. त्यामुळे त्यांचं छोटं पद गेलं तर त्यामध्ये कमीपणा काय?” असा उलट प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

 

IPL_Entry_Point