मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar Devendra Fadanvis : शरद पवार-देवेंद्र फडणवीसांनी केला एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

Sharad Pawar Devendra Fadanvis : शरद पवार-देवेंद्र फडणवीसांनी केला एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 08, 2023 05:50 PM IST

Sharad Pawar and Devendra Fadanvis traval in same car in Pune : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Sharad Pawar and Devendra Fadanvis traval in same car in Pune
Sharad Pawar and Devendra Fadanvis traval in same car in Pune

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि कॉँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यकारभारावरून नुकतीच टीका केली होती. तसेच एरवी देखील विविध मुद्यावरून पवार हे सरकारचे कान ओढत असतात. मात्र, आज पुण्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रम स्थळी आल्याने आज सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, एकत्र असतांना त्यांनी नेमकी कुठल्या मुद्यावरून चर्चा केली या बाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. दोन्ही नेते हे दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पुण्यात एकाच गाडीतून आले. हा कार्यक्रम भारती विद्यापीठाच्या धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, या कार्यक्रमाला दोन्ही नेते हे एकाच गाडीतून आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या गाडीतून कार्यक्रम स्थळी आले. सध्या राज्यात राजकीय कुरघोड्या सुरू असतांना पवार आणि फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा मात्र, रंगल्या आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या