मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune koyta Gang : पुणे पोलिसांचा धाक संपला? कोयता गँगचा ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला

Pune koyta Gang : पुणे पोलिसांचा धाक संपला? कोयता गँगचा ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 17, 2023 01:31 PM IST

Pune koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत अजूनही कायम आहे. सिंहगड येथील घटना ताजी असतांना शिवाजी नगर येथील एका मैदानात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यावर एकाने कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सिंहगड येथील घटना ताजी असतांना शिवाजी नगर येथे देखील एक घटना उघडकीस आली आहे. येथील मैदानात झोपले असलेल्या एका वृद्ध दाम्पत्यावर जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने हल्ला केल्याने वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी सतीश काळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसर दाद्या बगाडे ,दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे हे शिवाजीनगर या ठिकाणी असलेल्या मैदानवर झोपले होते. यावेळी त्यांची पत्नी देखील त्यांच्या सोबत होती. दरम्यान काही तरुणांनी कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला.

सतीश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून वाद झाले होते. या वादाचा राग आल्याने आरोपी चौघांनी मिळून सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला करत त्याच्यावर सपासप वार केले. यात फिर्यादी सतीश भीमा काळे यांनी हे वार चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र, ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपींनी हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवली.

पुण्यात कोयता गॅंगच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांचा धाक उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोज अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामुळे सांस्कृतिक नगरी आता गुन्हे नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

IPL_Entry_Point

विभाग