मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माऊलींच्या पादुकांना पवित्र निरा स्रान; पुण्याचा निरोप घेत साताऱ्याला प्रयाण

माऊलींच्या पादुकांना पवित्र निरा स्रान; पुण्याचा निरोप घेत साताऱ्याला प्रयाण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 28, 2022 04:27 PM IST

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने सकाळी साडेसहा वाजता वल्हे येथील मुक्काम आटोपून लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला.

नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी
नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी

 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2022 नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!   वाल्हे येथील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा येथे आला. यावेळी माऊली नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजरात दुपारी पवित्र नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचा स्नानाचा सोहळा पार पडला. हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी नीरा नदीच्या किनारी उपस्थित होते. स्रान सोहळ्यानंतर आपल्या वैभवी लवाजम्यासह माऊलींचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामासाठी विसावला.

  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने सकाळी साडेसहा वाजता वल्हे येथील मुक्काम आटोपून लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक झुणका-भाकर, वेगवेगळ्या चटण्या, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला. नीरा नगरीत माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालया समोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले. सव्वा अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदिच्या काठी विसावला.  

हैबतबाबांची जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी माऊलींच्या पादुकांना पुणे व सातारा जिल्हाची सिमा असलेल्या नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावर स्नान सोहळा झाला त्यानंतर दुपारचे भोजन आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी सोहळा मार्गस्थ झाला.

नीरा नदीच्या काठ झाला भक्तीमय

 नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून सर्वात पढे तुतारी वादक सलामी देत होते. मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक राजाभाऊ पवार-आरफळकर यांच्याकडे देण्यात आल्या. आरफळकरांसह सोहळयाचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई यांसह सोहळ्यातील मानकऱ्यांनी माऊलींच्या पादुक दत्तघाटावर आणल्या. 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घातले.

IPL_Entry_Point