मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी वाढपी बनून वारकऱ्यांची केली सेवा

Pune : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी वाढपी बनून वारकऱ्यांची केली सेवा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 23, 2022 07:05 PM IST

पालखी सोहळ्याचे स्वागत आज पोलिस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी केले. यावेळी त्यांनी वारक-यांना वाढपी म्हणून जेवण देत त्यांचा पाहूनचार केला. तसेच त्यांच्या सोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.

वारकाऱ्याना वाढताना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता
वारकाऱ्याना वाढताना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी आहे. या सोहळ्या सोबत हजारो वैष्णवांचा मेळा मुक्कामी पुण्यात आहे. तब्बल दोन वर्षानंतर वारक-यांचा पाहूनचार करण्याची संधी पुणे करांना मिळाली आहे. दरम्यान, आज दिवसभर दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. यावेळी वारक-यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात वारकरी भक्तीरसात मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले.

या पालखी सोहळ्याचे स्वागत आज पोलिस आयुक्त अभिनव गुप्ता यांनी केले. यावेळी त्यांनी वारक-यांना वाढपी म्हणून जेवण देत त्यांचा पाहूनचार केला. तसेच त्यांच्या सोबत भोजनाचाही आस्वाद घेतला.

<p>वरकऱ्यांसोबत प्रसाद ग्रहण करताना पोलिस आयुक्त गुप्ता&nbsp;</p>
वरकऱ्यांसोबत प्रसाद ग्रहण करताना पोलिस आयुक्त गुप्ता&nbsp;

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सपत्नीक संत ज्ञानेश्वर माहाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पुण्यात शांतता नांदू दे अशी प्रार्थनाही त्यांनी केली. यानंतर त्यांनी वारक-यांच्या पंगतीला त्यांनी वाढपी म्हणून सेवा केली. तसेच वारक-यांच्या सोबत त्यांनी भोजनाचाही आस्वाद घेतला.

दरम्यान, माऊलींचा सोहळा हा भवानी पेठेतील मंदिरात तर तुकोबांचा पालखी सोहळा हा निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. शुक्रवारी सकाळी या दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत सोबत प्रवास करणार असून त्यानंतर दिवे घाटातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर तुकोबांची पालखी ही पुणे सोलापुर मार्गाने पंढरपुरच्या दिशेने प्रवास करणार आहे.

IPL_Entry_Point