मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : बावनकुळे 'औरंगजेब जी' काय बोलले, संजय राऊत यांनी संधीच साधली!

Sanjay Raut : बावनकुळे 'औरंगजेब जी' काय बोलले, संजय राऊत यांनी संधीच साधली!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 05, 2023 12:28 PM IST

Sanjay Raut taunt Chandrashekhar Bawankule : औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' असा करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

Sanjay Raut - Chandrashekhar Bawankule
Sanjay Raut - Chandrashekhar Bawankule

Sanjay Raut taunt Chandrashekhar Bawankule : छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक की धर्मवीर यावरून सुरू झालेला वाद आता औरंगजेबापर्यंत येऊन पोहोचला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेबजी' असा केल्यानं ते टीकेच्या रडारवर आले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे यांना बोचरा टोला हाणला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बावनकुळे यांचा एक फोटो व एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यातील एका फोटोमध्ये बावनकुळे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या समवेत औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडिओत बावनकुळे हे औरंगजेबाचा 'औरंगजेब जी' असा उल्लेख करताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ ट्वीट करून आव्हाड यांनी भाजप नेत्यांच्या दुटप्पीपणावर प्रहार केला आहे.

संजय राऊत यांना याविषयी विचारलं असता त्यांनी बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली. 'त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं. म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. या सगळ्यावरच त्यांच्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी हाणला.

भाजपनं मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी १२ खासदारांवर सोपवल्याच्या प्रश्नावरही राऊत यांनी खोचक उत्तर दिलं. ‘रणनीती म्हणजे काय असतं? त्यांना तरी माहिती आहे का? खोके, पेट्या, पाकिटं कुठं कशी वाटायची? कुणाला कसं विकत घ्यायचं? ही त्यांची रणनीती असते. रणनीती हे लोकं आणि मतदार ठरवतील. खोकेवाले कधी येतायत याची वाट लोक बघतायत,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.

IPL_Entry_Point