मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  क्राईम पेट्रोलपेक्षाही थरारक.. सांगलीत व्यावसायिकाचे अपहरण; नंतर सापडला मृतदेह, पोलीसही चक्रावले

क्राईम पेट्रोलपेक्षाही थरारक.. सांगलीत व्यावसायिकाचे अपहरण; नंतर सापडला मृतदेह, पोलीसही चक्रावले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 17, 2022 07:39 PM IST

Sangli Crime News :सांगलीतील ५४वर्षीय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदाराचे १३ ऑगस्टच्या रात्री अपहरण झाले होते. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह वारणा नदीपात्रात तरंगताना आढळून आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

सांगलीत व्यावसायिकाचे अपहरण
सांगलीत व्यावसायिकाचे अपहरण

सांगली -सांगलीत एका बांधकाम व्यावसायिकाच्या मृत्यूने पोलीसही चक्रावले आहे. गुन्हेगारीवर आधारित टीव्ही शो क्राईम पेट्रोललाही लाजवेल इतका थरारक घटनाक्रम समोर आला आहे.सांगलीतील ५४वर्षीय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार माणिकराव पाटील यांचे १३ ऑगस्टच्या रात्री अपहरण झाले होते. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह वारणा नदीपात्रात तरंगताना आढळून आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मृत माणिकराव हे सांगली शहरातील राम मंदिर जवळ सिव्हिल हॉस्पिटल रोडवर इंद्रनील प्लाजा येथे राहत होते. काही लोकांनी जमीन दाखवण्याच्या बहाण्याने माणिकराव पाटील यांना रात्रीच्या वेळी घरातून बोलावले होते. त्यांना तुंग येथे बोलावले होते. त्यानंतर माणिकराव घरी परतलेच नाहीत, आज त्यांचा मृतदेह आढळून आला.

पाटील यांची गाडी मंगळवारी कोडिग्री गावाजवळ बेवारस स्थितीत सापडली होती. त्यानंतर आज सांगली शहराजवळील कवठेपिरान येथे वारणा नदीपात्रात माणिकराव यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या अपहरण आणि मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

माणिकराव १३ ऑगस्टच्या रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटूंबीयांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांच्या मुलाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत वडील गायब असल्याची तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. माणिकराव यांची गाडी तुंगू येथून बाहेर पडल्याचं सीसीटीव्हीत दिसत होते. त्यानंतर गाडी जयसिंगपूरच्या दिशेने गेली होती. तिथून बाहेर पडून गाडी कोडिग्रीजवळ बेवारस स्थितीत आढळली होती. मात्र माणिकराव यांचा शोध लागत नव्हता.

आरोपींनी माणिकराव यांचे अपहरण का केलं? कोणत्या वादातून त्यांची हत्या झाली? आदि प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी विशेष पथक स्थापन करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग