मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खळबळजनक.. सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला भरदिवसा लुटलं, मारहाण करून १ कोटी १० लाखांची रोकड लंपास
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

खळबळजनक.. सांगलीत द्राक्ष व्यापाऱ्याला भरदिवसा लुटलं, मारहाण करून १ कोटी १० लाखांची रोकड लंपास

29 March 2023, 0:10 ISTShrikant Ashok Londhe

Grapes Traders looted in sangli : तासगावमध्ये व्यापाऱ्याची गाडी अडवून त्यांना व त्यांच्या सोबत असणाऱ्याला मारहाण करून चोरट्यांनी गाडीतील सुमारे १ कोटी १० लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.

सांगली – सांगलीतील तासगाव मधून एका व्यापाऱ्याला तब्बल १ कोटी रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तासगावमध्ये व्यापाऱ्याची गाडी अडवून त्यांना व त्यांच्या सोबत असणाऱ्याला मारहाण करून चोरट्यांनी गाडीतील सुमारे १ कोटी १० लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. तासगावच्या दत्तमाळ परिसरातील गणेश कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे. महेश केवलानी असे लुटलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून ते मूळचे नाशिकचे आहेत. व्यापारासाठी ते सांगलीत आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

तासगावमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घटना. महेश केवलानी यांनी तासगाव तालुक्यातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी केली होती. त्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी ते सांगलीतून तासगावकडून स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. एक कोटी १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग त्यांच्यासोबत होती. तासगावमधील गणेश कॉलनी येथे त्यांची गाडी आली असता ६ ते ७ जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली व गाडीचालक, केवलानी तसेच त्यांच्या एका कामगाराला मारहाण करून गाडीतील एक कोटी १० लाख रुपये असलेले बॅग घेऊन पसार झाले.

तासगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच तपासासाठी पथके रवाना केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

चोरट्यांनी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी यांच्यावर पाळत ठेवून हा कट रचल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विभाग