मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangamner Accident: संगमनेरमध्ये दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार

Sangamner Accident: संगमनेरमध्ये दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 18, 2023 10:48 AM IST

Sangamner Road Accident: संगमनेर- अकोले रस्त्यावर दुधाच टँकर आणि दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Road Accident
Road Accident (HT)

Accident: संगमनेर- अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीत विचित्र अपघात घडला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी रात्री हा अपघात घडल्याची महिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास संगमनेर- अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषीकेश हासे (वय, २०), सुयोग हासे (वय, २०) आणि निलेश सिनारे (वय, २६) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आळे आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून चालकालाही ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज आणखी एक अपघात झाला आहे. मुंबईवरून सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन गाडी थेट डिव्हायडरमध्ये घुसली. यानंतर डिव्हायडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून घुसला. यात तरुणी किरकोळ जखमी झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी सात वाजताच्या सुमारास सोमाटने फाट्यावर घडली.

IPL_Entry_Point

विभाग