मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: पुण्यातील वाघापूर- शिंदवणे मार्गावरील वाहतूक आजपासून महिन्याभर बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Pune: पुण्यातील वाघापूर- शिंदवणे मार्गावरील वाहतूक आजपासून महिन्याभर बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Mar 24, 2023 10:36 AM IST

Pune: रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यातील वाघापूर- शिंदवणे मार्गावरील वाहतूक आजपासून २९ एप्रिलपर्यंत म्हणजेच एकूण ३५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune Traffic
Pune Traffic

Pune News: महाराष्ट्रातील रस्ता अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाचे निवारण करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने राज्यातील महामार्ग दुरुस्ती आणि मजबुत करण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई- गोवा महामार्गानंतर आता पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११७ च्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील वाघापूर- शिंदवणे मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक आजपासून महिन्याभरासाठी (२४ मार्च २०२३- २९ एप्रिल २०२३) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील वाघापूर-शिंदवणे मार्गावरील रस्ता अपघातात अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात होत असल्याने वाघापूर-शिंदवणे मार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील वाघापूर ते शिंदवणे रस्त्यावरून दररोज लाखो वाहने ये-जा करतात. मात्र, गेल्या महिन्यांपासून या रस्त्यावरील खड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या रस्त्याचे दुरूस्तीचे काम सुरु केले आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक सासवड-पिसर्व-टेकवडी-बोरियंडी मार्गावरुन वळवण्यात आली. याशिवाय, सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गाचाही वाहनचालक वापर करू शकतात. संभाव्य वाहतूक कोंडी आणि रस्ता अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा करण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग