मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Video: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारची धडक, अर्धा किलोमीटर फरफटत नेले; पुण्यातील घटना

Video: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारची धडक, अर्धा किलोमीटर फरफटत नेले; पुण्यातील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 10, 2023 12:37 PM IST

Pune Hit and Run: पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीला भरधाव कारने धडक दिली आहे.

Accident
Accident (HT)

Road Accident: पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी बीआरटी रोड येथून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीला भरधाव कारने धडक देऊन अर्धा किलोमीटर फरफटत नेले. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांनी आरोपीला अटक केली नसल्याचे समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी बीआरटी रोडवर रविवारी (५ मार्च २०२३) पहाटे एक व्यक्ती मॉर्निंग वॉकला गेला असता एका भरधाव कारने त्याला धडक दिली. या अपघात संबंधित व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर अपघातग्रस्त व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेला पाच दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली नाही.

IPL_Entry_Point

विभाग