मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Beed Accident : भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Beed Accident : भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 22, 2023 12:48 AM IST

car-truck Accident : भरधाव कार कंटेनरवर आदळून बीड जिल्ह्यातील एकाच कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अहमदनगर-पुणे मार्गावर शिरुर येथे एक भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. कार-कंटेनर अपघातात बीड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. सर्व मृत डोमरी गावातील असल्याचे समजते.  शोककळा पसरली आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झाला.

ट्रेंडिंग न्यूज

एकाच कुटूंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात पुणे-नगर रस्त्यावर शिरूर तालुक्यातील कारेगाव जवळ झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार मागून आदळल्याने हा अपघात झाला. 

सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२)  व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर या अपघातात अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे  चालक  जखमी झाले आहेत.

जखमींवर कारेगाव मधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नी, मुलगी व आई-वडिलांचा या अपघातात मृत्यू झाला. यामुळे डोमरी गावावर शोककळा पसरली आहे. 

 

IPL_Entry_Point

विभाग