मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rickshaw Bandh Protest: पुण्यात ४० रिक्षाचालकांसह संघटनेच्या अध्यक्षांना अटक; आंदोलन चिघळण्याची शक्यता

Pune Rickshaw Bandh Protest: पुण्यात ४० रिक्षाचालकांसह संघटनेच्या अध्यक्षांना अटक; आंदोलन चिघळण्याची शक्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 13, 2022 09:28 AM IST

Pune Rickshaw Bandh Protest : पुण्यात बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालकांनी सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. या प्रकणारी पोलिसांनी रिक्षाचालक संघटनेच्या अध्यक्षांना आणि तब्बल ४० अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

रिक्षा चालकांचे अनोखे आंदोलन
रिक्षा चालकांचे अनोखे आंदोलन

पुणे : पुण्यात बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालकांनी सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. संगमपुलावर रिक्षा चालकांनी रिक्षा सोडून दिल्याने रस्ता बंद झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली असून रिक्षाचालक संघटनेच्या अध्यक्षांना आणि तब्बल ४० अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात बाईक टॅक्सीच्या विरोधात सोमवारी रिक्षा चालकांनी चक्काजाम आंदोलन केले. पुण्यात आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक जमले व त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलनात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवलाहोता. रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा आरटीओ कार्यालयासमोर रस्त्यातच सोडून निघून गेले. संध्याकाळी देखील रिक्षा चालकांनी आरटीओ चौकात रिक्षा रस्त्यात लावल्या होत्या. रात्री उशिरा पोलिसांनी येऊन त्या बाजूला केल्या. यावेळी ४० रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, आज सकाळी देखील संगम पुलावर रिक्षा चालक जमू लागले आहे. आज देखील रिक्षा चालक आंदोलन तयार करण्याच्या तयारीत आहेत. पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असून जमणाऱ्या आंदोलकांना हुसकावून लावले जात आहेत. यामुळे आज देखील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील रिक्षा चालकांनी संगम ब्रीज येथील आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन केले. अनेक रिक्षा चालकांनी आपली रिक्षा रस्त्यावरच सोडून दिल्याने शकडोच्या संख्येने रिक्षा रस्त्यावर उभ्या होत्या अन् रिक्षाचे मालक घरी निघून गेले होते. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावरच सोडून दिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग