Pune News: विविध गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या पुण्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुण्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनावर चलन फाडून पोलीस अधिकाऱ्याकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी या वाहनाचा आणि चलन फाडल्याचा फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मजूर अड्डा या ठिकाणी फुटपाथवर पोलिसांचे वाहन उभे होते. विचित्र पद्धतीने आणि नियम डावलून वाहन उभी केल्यामुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागला होता. याबाबात वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांच्या वाहनाचे चलन तयार केले. तसेच ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली वाहन उभे होते, त्या पोलीस अधिकाऱ्याकडून व्यक्तिगत दंड वसूल करण्यात आले आहे.
या कारवाईनंतर पुणे वाहतूक पोलिसांनी एक ट्विट केले. ज्यात त्यांनी सर्वांसाठी नियम साखरेच असून नियमानुसार सर्वांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच मजूर अड्डा येथे फुटपाथवर उभा असलेल्या पोलिसांचे वाहनावर चलन क्रमांक पीएनसीसीसी२३०००६८७१५१ अन्वये कारवाई करून वाहन तात्काळ काढून घेण्यात आले आहे.
संबंधित बातम्या