मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार, एकास अटक

Pune: पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार, एकास अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 30, 2023 04:16 PM IST

Manjri Rape: पुण्यातील मांजरी परिसरात एका ५० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला.

(REPRESENTATIVE IMAGE)
(REPRESENTATIVE IMAGE) (HT_PRINT)

Pune Crime: पुण्यातील वसतिगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आरोपीने दोन वर्षांपूर्वी पीडिताला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अखेर या प्रकरणी पीडिताने आरोपीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

लॉरेन्स फॅन्सीस अँथनी (वय 50) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, पीडित मुलगी पुण्यातील एका वसतिगृहात राहायला होती. आरोपी लॉरेन्स हा त्याच वसतिगृहात काम करत होता. त्यावेळी आरोपीने पीडिताला नवीन वसतिगृहात हलविण्याच्या बहाण्याने तिच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने पीडिताशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. हा संपूर्ण प्रकार एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला.

अंधेरीत सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

मुंबईतील अंधेरी उपनगरात काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी ३० वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच परिसरात राहतात. त्या ओळखीचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

IPL_Entry_Point

विभाग