मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: सासरच्या मंडळींची संसारात ढवळाढवळ, कंटाळून जावयाने स्वत:चे आयुष्य संपवले, चिठ्ठीत लिहले...

Pune: सासरच्या मंडळींची संसारात ढवळाढवळ, कंटाळून जावयाने स्वत:चे आयुष्य संपवले, चिठ्ठीत लिहले...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 24, 2023 04:22 PM IST

पुण्यातील हडपसर भागात एका व्यक्तीने सासरच्या मंडळीच्या त्रासाला वैगातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime
Crime

Pune Suicide: पुण्यातील हडपसर भागात एक धक्कादायक घटना घडली. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला वैगातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली, ज्यात त्याने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या पत्नीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभय गवळी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभयने २०१४ मध्ये तृप्तीशी लग्नगाठ बांधली. दोघेही शेवाळेवाडी येथील भडलकरनगर येथे राहायला होते. परंतु, या दोघांचा विवाह झाल्यापासून तृप्तीचे आई, वडिल, भाऊ आणि वहिणी त्यांच्या संसारात ढवळाढवळ करीत होते. तृप्ती देखील त्यांच्या आई-वडिलांच्या सांगण्यानुसार वागत होती. ज्यामुळे अभय आणि तृप्ती यांच्यात अनेकदा वाद झाला. या नेहमीच्या त्रासाला वैतागून अभयने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांना अभयच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली. ज्यात पत्नी तृप्ती गवळीसह सासरकडील चार जण मंडळी जबाबदार असल्याच म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तृप्ती गवळी, उषा जालिंदर आंबवडे (सासू), जालिंदर आंबवडे (सासरा), संतोष आंबवडे (मेव्हणा) आणि सारिका आंबवडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग