मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Weather : पुणे पुन्हा राज्यात सर्वांत थंड; तिसऱ्यांदा सर्वाधिक कमी तपमानाची नोंद

Pune Weather : पुणे पुन्हा राज्यात सर्वांत थंड; तिसऱ्यांदा सर्वाधिक कमी तपमानाची नोंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 11, 2022 12:12 PM IST

Pune Weather update : पुण्यात गुरुवारी राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. हे तापमान हंगामातील सर्वाधिक कमी तापमान होते. तब्बल १२. ८ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे.

पुणे राज्यात सर्वात थंड
पुणे राज्यात सर्वात थंड

पुणे: पावसानंतर पुणेकर आता थंडीने गारठले आहेत. पाऊस माघारी फिरल्यानंतर आता पुण्यात थंडीचा कडाका वाढला आहे. या महिन्यात तिसऱ्यांना सर्वात कमी तपमानाची नोंद झाली आहे. एकाच दिवसात रात्रीच्या किमान तापमानात ३ अंश सेल्सिअसने घट होऊन गुरुवारी (दि १०) शहरात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तापमानातील हा चढ-उतार पुढील काही दिवस कायम राहणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

पुण्यात या महिन्याच्या सुरूवातीपासून तापमानात कमालीची घट झाली आहे. तापमानातील ही घट २३ ऑक्टोबरपासून आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी पडत असलेल्या थंडीपाऊन बचाव करण्यासाठी लोक शेकोट्या पेटवू लागले आहे. वातावरण कोरडे झाले असून या मुळे गारठा वाढला असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे. यामुळेच रोज तापमानात घट होत असून गुरुवारी (दि १०) १२.८ एवढे हंगामातील तिसरे सर्वात निचांकी तपमानाची नोंद झाली आहे.

पुणे शहरामध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानात घट होऊन थंडी अवतरली. त्यानंतर रात्रीचे किमान तापमान सातत्याने १३ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा दक्षिणेकडे प्रभाव सुरू झाल्यानंतर राज्यात काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत आहे. त्याचा परिणाम पुणे आणि परिसरावरही काही प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत. बुधवारी (दि ९) पुण्यातील तापमान हे १५.८ अंशांवर होते. गुरुवारी तापमान तीन अंशांनी घटून १२.८ अंश सेल्सिअस झाले. हे तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले आहे.

हिवाळच्या सुरवातीलाच एवढ्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या हंगामातील हे सर्वात कमी तापमान होते. गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे. २०१६ मध्ये ३० तारखेला १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी देखील  पाच वर्षांतील तापमानाचा नीचांक नोंदविला गेला. २०१२, २०१८ आणि २०२१ या तीन वर्षांतही ३० ऑक्टोबरला सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. पुण्यात ऑक्टोबरमधील आजवरचे सर्वांत नीचांकी किमान तापमान १९६८ मध्ये २९ तारखेला ९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर काल सर्वात कमी तापमान नोंदवण्यात गेले होते.

IPL_Entry_Point

विभाग