मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: लष्करात 'कर्नल' असल्याचं भासवून पुण्यातील रिक्षाचालकाचा अनेकांना लाखोंचा गंडा

Pune: लष्करात 'कर्नल' असल्याचं भासवून पुण्यातील रिक्षाचालकाचा अनेकांना लाखोंचा गंडा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 10, 2022 06:07 PM IST

Auto Driver dupes people posing as army officer: कर्नल असल्याचे सांगत लष्करात भरती करून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या एका रिक्षा चलकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे.

pune crime
pune crime

पुणे : स्वत:ला कर्नल असल्याचे सांगत तरुणांना लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या पुण्यातील एका रिक्षा चालकाला मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. लष्कराच्या गुप्तचर खात्याने (एमआय) तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने संयुक्तरित्या मोहीम राबवून बोपोडी येथून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. रिक्षाचालक असून तो पठाणकोट येथे दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्हयात पोलिसांना हवा होता.  

संजय रघुनाथ सावंत (वय ५५, रा.बोपोडी, पुणे) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी रिक्षा चलकाचे नाव आहे. पठाणकोट पोलिसांचे एक पथक पुण्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले असून बुधवारी त्यास पुण्यातील न्यायालयात हजर करुन ट्रान्झिट रिमांड घेण्यात येत आहे. पठाणकोट येथे लष्करात नोकरी लावून देण्याचे सांगून अनेक उमेदवार आणि पालकांकडुन लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासात दोन ते तीन आरोपींना अटक करण्यात आले आह.

पठाणकोठ येथे एका गुन्ह्यात फरार असलेला एक आरोपी हा पुण्यात बोपोडी येथे राहत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर खात्याला मिळाली होती. त्यानुसार त्याचा शोध पुणे पोलिस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागामार्फत आणि पठाणकोट पोलीस करत होते. आरोपी संजय रघुनाथ सावंत यास त्यांनी अटक केली असून तपासाकरता कायदेशीररित्या ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहा. पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार, राजस शेख, संजय आढारी, प्रविण भालचीम या युनिट चारचे पथकाने व मिलीट्री इंटेलिजन्स यांचे संयुक्त पथकाने केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग